संस्थे बद्दल

विश्वास, पारदर्शकता आणि सभासदांच्या आर्थिक प्रगतीसाठी समर्पित असलेली SBV विठाई मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., सांगोला ही आधुनिक आर्थिक सेवांचा विश्वासार्ह प्रवास घडवणारी संस्था आहे

SBV विठाई मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., सांगोला

SBV विठाई मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., सांगोला ही संस्था सभासदांच्या आर्थिक प्रगतीसाठी समर्पित, विश्वासार्ह आणि आधुनिक आर्थिक सेवा देणारी सहकारी संस्था आहे. संस्थेची नोंदणी मे २०२६ मध्ये मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून झाली असून, पारदर्शकता, सुरक्षितता आणि उत्कृष्ट ग्राहकसेवा ही संस्थेची प्रमुख तत्त्वे आहेत.संस्थेच्या माध्यमातून बचत खाती, मुदत ठेव (FD), आवर्ती ठेव (RD), मासिक उत्पन्न योजना (MIS), दैनंदिन ठेव (SIP) तसेच वैयक्तिक कर्ज, तारण कर्ज, सुवर्ण कर्ज आणि आधुनिक डिजिटल बँकिंग सुविधा उपलब्ध करून सभासदांच्या आर्थिक गरजा पूर्ण केल्या जातात. प्रत्येक व्यवहारामध्ये विश्वास, सुरक्षितता आणि ग्राहक समाधानाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. शिवाजी बयाजी व्हणमाने-पाटील यांच्या दूरदृष्टीतून या संस्थेची स्थापना झाली. चेअरमन डॉ. वृषाली रणजितसिंह व्हणमाने-पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्था प्रगतीपथावर वाटचाल करत असून मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. भाऊसो रामचंद्र गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक, पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा सभासदांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत.

आमचा प्रवास

सन २०२१ मध्ये विठाई अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना झाली आणि त्याच क्षणापासून "विठाई परिवार" या विश्वासाच्या प्रवासाला सुरुवात झाली.अल्पावधीतच पारदर्शक व्यवहार, उत्कृष्ट सेवा आणि सभासदांचा वाढता विश्वास यामुळे विठाई अर्बनने आपले वेगळे स्थान निर्माण केले. मात्र मर्यादित कार्यक्षेत्रामुळे अनेक इच्छुक नागरिकांपर्यंत संस्था पोहोचू शकत नव्हती.ही गरज ओळखून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. ⁠शिवाजी बयाजी व्हाणमाने-पाटील यांनी सन २०२६ मध्ये "SBV विठाई मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि." स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांपर्यंत विश्वासार्ह आर्थिक सेवा पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला.आज SBV विठाई मल्टिस्टेट ही केवळ आर्थिक संस्था नसून, हजारो कुटुंबांच्या विश्वासाची आणि प्रगतीची भागीदार बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे